बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आज 10 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 272 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 262 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात बीड 3, धारूर 1,केज 1 परळी 1 पाटोदा 2 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
राज्यातील कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवासंपासून घट होत आहे. आज राज्यात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
कालच्या तुलनेत आज कमी रूग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 3249 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती.
राज्यात 3515 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 78,10,953 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97. 85 टक्के झाले आहे. सध्या 23447 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
पाच रूग्णांचा मृत्यू
राज्यात आज पाच करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 85 टक्के एवढा आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)