बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री आज 6 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 481 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 475 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1,बीड 1,गेवराई 3,केज 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात कोरोनाचे 3 हजार 249 नवे रुग्ण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेली कोरोना (Corona) रुग्णसंख्या आता काही प्रमाणात कमी झाली.
आहे. गेल्या 24 तासांत राज्यात (Maharashtra) कोरोनाचे 3 हहजार 249 नवे रुग्ण आढलून आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान, 4 हजार 189 जणांनी कोरोनावर मात केली. पुढील 15 दिवसांत रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या 23 हजार 996 रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात 17,092 कोरोनाचे रुग्ण

भारतात गेल्या 24 तासांत 17,092 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 29 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,09,568 झाली. तर पॉझिटिव्हिटीचा दर 4.14 टक्के आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *