ठाकरे सरकार कोसळलं,अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला आहे. त्यानंतर मात्र शिवसेनेचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. शेवटी आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. हे वृत्त अनेकांना धक्का देणारं आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा देखील मान्य केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी तो राजीनामा लगेच मान्यही केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार गेल्या आठ दिवसांच्या राजकीय चढाओढीनंतर अखेर कोसळलं आहे.
“गुळाच्या ढेपेला मुंगळा चिपकून बसतो, तसा मी चिपकून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं.
“शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी आपल्याशी संवाद साधून आश्वास्त केलं होतं. असो हा फार पूर्वीचा किस्सा आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत अतिशय चांगल्यापद्धतीने कार्यभार झाला. छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देवून सरकार म्हणून काम सुरु केलं. हा एक योगायोग होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आपण विसरणार नाहीत हे माहिती आहे
आयुष्य सार्थकी झाली, अशी माझी भावना आहे. औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर नाव दिलं आहे. तर उस्मानाबादचं धारावीश नाव दिलं आहे. असे अनेक गोष्टी आपण करत आलो आहोत.
एखादी गोष्ट चांगली असली की त्याला दृष्ट लागते, असं म्हणतात. शरद पवार आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. आजच्या बैठकीत शिवसेनेचे फक्त चार मंत्री होते. औरंगाबादच्या नामकरणाचा ठरवा मांडला तेव्हा दोन्ही पक्षांनी विरोध केला नाही. त्यांचे विशेष आभार मानतो. ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले.