ब्रेकिंग न्यूज:उद्या दहावीचा निकाल:दुपारी एक वाजता ऑनलाइन दिसणार
उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.
मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.
असा तपासा निकाल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर ा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.