ऑनलाइन वृत्तसेवा

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी: निकालाबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, बुधवारी ८ जून रोजी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात होते.

त्यातील काही अहवालांमध्ये बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान आज बारावीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

असा पाहता येईल बारावीचा निकाल

  • बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
  • त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
  • इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  • सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *