देशात कोरोना वाढू लागला:24 तासात 3,712 नवीन रुग्णांची नोंद:राज्यात १०४५ कोरोना पॉझिटिव्ह
देशात दिवसेंदिवस कोरोना वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात भारतात कोरोना बाधितांची 3,712 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
तर यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच गेल्या 24 तासांत एकूण 2,584 डिस्चार्ज झाले, एकूण पुनर्प्राप्ती दर सुमारे 98.74 टक्के आणि एकूण पुनर्प्राप्ती डेटा 4,26,20,394 वर पोहोचला.
आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 चे एकूण सक्रिय रुग्ण 19,509 वर पोहोचले आहेत. काल नोंदणीकृत सक्रिय प्रकरणांची संख्या 18,386 होती.
24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 1,123 प्रकरणांची वाढ नोंदवली गेली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की एकूण संसर्गांपैकी ०.०४ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.
राज्यात १०४५ कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : महाराष्ट्रात आज १०४५ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ५१७ जण बरे झाले. राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर, दिवसभरात ५१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९८.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी राज्यात हजाराच्या वर रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने (Mumbai Corporation) खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली असून लसीकरणावर (vaccination) भर देण्यात आला आहे.
(सदरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)