आनंदाची बातमी:मान्सूनची आगेकूच,लवकरच आगमन
मुंबई: यंदा मान्सूनचे वेळेअगोदरच आगमन होणार आहे. मान्सूनची आगेकूच सुरु आहे. मान्सूनला श्रीलंकेच्या वेशीवर ब्रेक लागला होता. तो पुढे ४८ तासांनी पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. आता पुढील ४८ तासात दक्षिण अरबी समुद्रात मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार आहे.
येणाऱ्या ४८ तासांत मान्सून (Monsoon) पुढे सरकण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. केरळमध्ये उद्या २७ मे रोजी मान्सून सक्रीय होण्यास पोषक वातावरण आहे. यावर्षीही पाऊस (Rain) ९९ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २७ मे रोजी पावसाची सुरुवात केरळमध्ये होईल तर पुढील ५ दिवसात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नैऋत्य मॉन्सून पुढील ४८ तासांत नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन परिसर, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यात कधी येणार मान्सून?
मान्सून पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्रात दाखल होईल. पुढे २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून सक्रीय होईल. तर पुढील पाच दिवसात म्हणजेच १ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पण हा पाऊस कोकण, गोव्यात आणि राज्यातील काही भागात पडेल. हा पाऊस मध्यम कमी प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे. तसेच पुढे काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे