बीड जिल्हा कोरोनामुक्त होतोय:जिल्ह्यात फक्त 3 रुग्ण घेत आहेत उपचार
बीड/प्रतिनिधी
गेल्या 3 वर्षात जगणे मुस्किल करणारा कोरोना आता बीड जिल्ह्यातून हद्दपार होत आहे सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे तर केवळ 3 रुग्ण उपचार घेत आहेत एक दोन दिवसात संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे ही दिलासादायक आणि महत्वाची बाब आहे
जीवघेणा कोरोनाने माणसाचे जगणे मुस्किल केले होते,अनेकांचे जीव गेले,अनेकांचे संसार उघडे पडले,अनेक तरुण बेरोजगार झाले तर अनेक नाती देखील दुरावली गेली तर काही जण भीतीपोटी देखील दगावले,माणसाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता,जिकडे तिकडे चिंतेचे वातावरण झाले होते,बीड जिल्ह्यात कोरोनाने जसे डोके वर काढले होते तसे लोकही आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत होते,एवढेच नव्हे तर अनेकांनी मदतीचे हात पुढे करत लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला,गोरगरिबांना दोन वेळचे अन्न पुरवले गेले,माणसाच्या मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या अनेक सामाजिक,राजकीय आणि तरुणांनी या काळात मोलाची साथ देत कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय आणि कौतुकाची बाब ठरली,तर जिल्ह्यातील डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार करून दिवसरात्र मेहनत घेतली,रुग्णांना मानसिक आधार देत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले,तसे जनतेनेही साथ दिली याचाच परिणाम म्हणून बीड जिल्हा आता कोरोनामुक्त होतो आहे ही आनंदाची बाब आहे,जिल्ह्यात लसीकरण देखील झपाट्याने झाले,सध्या केवळ 3 रुग्ण उपचार घेत असून तेही बरे होऊन जिल्हा कोरोनामुक्त होत आहे,आता येणाऱ्या काळात अजून काही दिवस अशीच काळजी घेतली तर येणारे संकट आपण थांबवू शकतो अशी खात्री वाटू लागली आहे