लॉकडाऊन बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश मिळाले नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवायचा की नाही यासंबंधी लवकरच केंद्र सरकार घोषणा करणे अपेक्षित आहे. पण त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे मत जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली.
देशात ज्या वेगाने कोरोना पसरत आहे त्याचा विचार करता लॉक डाऊन हटवणे हिताचे राहणार नाही. याविषयीचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतले. लॉक डाऊन ०.५ याविषयी शाह यांनी चर्चा केली. दरम्यान, काही राज्यांनी आतापासूनच आपल्या राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या चर्चेनंतर सरकार नेमका काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचं आहे.