तिरूमला अॅग्रो प्रॉडक्टचे शानदार लाँचिंग!
तिरूमला ऍग्रो मिल्की एक्सएल सरकी पेंड पशुखाद्याचा शानदार शुभारंभ
‘पशु स्वास्थ आणि दूधही जास्त’ ही ब्रीद घेऊन बीडचा कुटे ग्रुप पोहोचला देशभरात
बीड (प्रतिनिधी):- कुटे ग्रुपच्या माध्यमातून 40 हून अधिक कंपन्यांचे जाळे विस्तारत देशभरात आपल्या विविध उत्पादनातून ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन केलेल्या बीड येथील प्रथितयश कुटे ग्रुपच्या ‘तिरूमला अॅग्रो मिल्की एक्सएल सरकी पेंड पशुखाद्य’ या आणखी एका नव्या उत्पादनाचा शुभारंभ 10 एप्रिल 2022 रोजी कुटे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर सौ.अर्चनाताई कुटे, ओएओ कंपनीचे सीईओ आर्यन सुरेश कुटे आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर हे तिरूमला अॅग्रो पशुखाद्याचे ब्रँड अँम्बसेडर आहेत. पशुखाद्य शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील भव्य पडदा ओढत कुटे ग्रुपने आपले नवे उत्पादन बाजारपेठेसाठी खुले केले. तसेच प्रसिध्द सिने अभिनेते नाना पाटेकर हे ब्रँड अँम्बसेडर असलेल्या ‘तिरूमला अॅग्रो मिल्की एक्सएल सरकी पेंड पशुखाद्याच्या जाहिरातीचे विमोचन करण्यात आले.
बीड शहरालगतच्या मोची पिंपळगाव येथील तिरूमला रिफायनरीच्या भव्य प्रांगणात रविवारी दुपारी हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डोळे दिपवून टाकणारा सुसज्ज सभामंडप… तितकेच सुंदर आणि नियोजन…कुटे ग्रुपचे सर्व संचालक…देशभरातून आलेले विविध युनिटचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी…अतिशय स्वच्छ परिसर आणि शिस्तबद्ध कर्मचार्यांकडून कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे हास्यमुद्रेत करकमलाने होणारे स्वागत…अन सुंदर असे संगीतवाद्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा ‘तिरूमला अॅग्रो पशुखाद्य’ मिल्की एक्सएल सरकी पेंड उत्पादन शुभारंभ पार पडला. या प्रसंगी राधा काकू कुटे, आशाताई पाटोदेकर, डॉ.पद्माकर पाटोदेकर, यशवंत कुलकर्णी, डॉ. जगदीश फुलझळके व कुटे ग्रुपचे सर्व संचालक मंडळ आणि विविध युनीटचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विश्वास आणि गुणवत्ता हीच कुटे ग्रुपची ओळख – सौ. अर्चनाताई कुटे
यावेळी बोलतांना मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई कुटे यांनी सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरूवात केली.विश्वास आणि गुणवत्ता हीच आपल्या कुटे ग्रुपची ओळख आहे. त्या म्हणाल्या, कितीही संकटे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची शिकवण स्व. अण्णांनी आम्हाला दिली. आज ‘तिरूमला अॅग्रो मिल्की एक्सएल सरकी पेंड पशुखाद्याचा’ शानदार शुभारंभ झाला आहे.पशुधनाला जे खाद्य आपल्याला द्यायचे आहे ते दर्जेदार आणि हायजेनिक आहे असे सांगत अर्चनाताई म्हणाल्या, प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर हे जमिनीशी जोडलेले आणि शेतकर्यांशी ऋणानुबंध असणारे म्हणून त्यांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले आहे. कुटे ग्रुपमधील महिला कर्मचार्यांचा वाढता सहभाग आणि त्यांच्याकडून होणारे नियोजनपूर्वक काम यामुळे कुटे ग्रुप गतिमान वाटचाल करत आहे. अनेक मुलींना रोजगार देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावता आले याचे खूप समाधान वाटते. महिला कर्मचारी कुटूंबातील सदस्याप्रमाणे कुटे ग्रुपमध्ये काम करतात याचा आम्हाला कायम अभिमान आहे. ग्रामीण भागातील या मुलींना आज मी कार्पोरेट लूक दिला याचे समाधान असल्याचे त्या म्हणाल्या.
अण्णांच्या दर्शनाने मिळते ऊर्जा- सुरेश कुटे
भाषणाच्या सुरूवातीला सुरेश कुटे यांनी आपले वडील स्व.ज्ञानोबा (आण्णा) कुटे यांच्या आठवणीला उजाळा दिला. आण्णांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार आम्हाला दिले. त्यांच्या संस्कारातून आमची जडण-घडण झाली. अडचणी आल्या तरी न डगमगता त्याला तोंड देण्याची शिकवण आण्णांनी दिली. ते जरी आमच्यात नसले तरी त्यांच्या समाधीच्या दर्शनाने नित्य नवी उर्जा मिळते असे उद्गार सुरेश कुटे यांनी काढले.(ADVT)