बीड

एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवार भरतीची प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने

बीड, दि. 17 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड विभाग यांच्या मार्फत फेब्रुवारी 2022 या सत्रात विविध व्यवसायात शिकाऊ उमेदवार निवडीची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. केंद्र शासनाने तयार केलेल्या एम.आय.एस. पोर्टलवर apprenticeship india.org या वेबसाईवर शिकाऊ उमेदवार भरतीची प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

तरी शिकाऊ उमेदवार निवडीबाबत विविध व्यवसायात भरावयाच्या जागा, विद्यावेतन, शैक्षणिक पात्रता, वय शुल्क, शेवटची तारीख इत्यादी अटी व शर्तीच्या माहितीसाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या वरील वेबसाईटवर किंवा विभागीय कार्यालय, रा.प.बीड 431122 , दूरध्वनी क्र. 02442222580 वर संपर्क साधावा. असे, आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ, बीड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *