अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा, मोबाईलसह बालसंगोपनाच्या निधीतही घसघशीत वाढ
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
यात एकात्मिक बाल विकाससेवा योजनेच्या अंमलबजावईत अथिक अचूकता, सुलभता वत्परता येण्यासाठी ई-शक्ती योजनेतून 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच बालसंगोपनासाठी 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रतिबलाक अनुदानात 1125 रुपयांवरून 2 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृहातील विद्यार्थीनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सींग मशीन बसवण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातील इतर महत्वाच्या घोषणा..
-उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
-शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
-क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
-शेततळ्यांना आता 75 हजारांचे अनुदान देणार
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
-गोसीखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रूपये उपलब्ध करून देणार
-महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे.
-कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
-कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार
-बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
-हळद संशोधन 100 कोटी
-विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार
-मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे
-कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी
-कृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
-हवेलीत संभाजीराजेंचं स्मारक उभारणार