बीड जिल्ह्यात 34 कोरोना बाधित:राज्यात 4359 तर देशात 44877 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात 34 कोरोना बाधित:राज्यात 4359 तर देशात 44877 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1428 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 34 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1394 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 1 बीड 8 धारूर 4 गेवराई 4 केज 4 माजलगाव 1 परळी 5 पाटोदा 1 शिरूर 1 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २४ तासांत ४ हजार ३५९ रूग्णांची नोंद
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात २४ तासांत ४ हजार ३५९ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३२ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज एकूण ५२ हजार २३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३९,४४७ झाली आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे.
राज्यात आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ७६,३९,८५४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के एवढे झाले आहे.
देशात ४४ हजार ८७७ रुग्णांची नोंद
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अस्त सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या २४ तासात देशात ४४ हजार ८७७ रुग्णांची नोंद झाली आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट आता ३.१७ टक्के झाला आहे. देशात आजघडीला ५ लाख ३७ हजार ४५ केसेस ॲक्टीव्ह केसेस आहेत.
गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत १७२.८१ कोटी डोस देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १.६८ कोटी बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना लावण्यात आले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)