ऑनलाइन वृत्तसेवा

उद्यापासून 12 वी परीक्षाचे हॉल तिकीट बोर्डाच्या वेबसाईटवर उपलब्ध

बुधवार (दि. ९) पासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचं हाॅलतिकीट उपलब्ध होणार आहे. ४ मार्चपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ( 12th Exam ) सुरू होत आहे.

बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन हाॅलतिकीट उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन हाॅलतिकीट डाऊनलोड करावे, असे प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

12th Exam : मुख्याध्यापक, प्राचार्यांची स्वाक्षरी आवश्‍यक

www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर १२ वी बोर्डाचे ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. दरम्यान, हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

असं करा हाॅलतिकीट डाऊनलोड?

१) पहिल्यांदा www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जावं.

२) त्यानंतर College login या पर्यायामध्ये निवडावा.

३) त्या पर्यायावर जाऊन विद्यार्थी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकतात.

संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे.

हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *