महाराष्ट्रमुंबई

देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा:सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे.

राज्य सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. राज्यात सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम २५ नुसार महाराष्ट्र राज्य सरकारला सोपवलेल्या अधिकाराचा वापर करून राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

“लतादीदींच्या जाण्याने एका स्वरयुगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरच मातृतुल्य आशीर्वाद हरपला” अश्या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *