बीड जिल्ह्यात 115 कोरोना बाधित:जिल्ह्यात 180 रुग्ण बरे झाले:कोरोना कमी होऊ लागला
राज्यात 15140 तर देशात 1 लाख 67059 कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1098 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 983 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 18 बीड 30 धारूर 2 गेवराई 10 केज 6 माजलगाव 7 परळी 7 पाटोदा 4 शिरूर 4 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात 180 रुग्णांना डिस्चार्ज
काल बीड जिल्ह्यात 180 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7365 झाली असून 2851 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 13.14% होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.04% टक्के असून 1 लाख 3111 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1403 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी:15 हजार 140 नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140 नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 91 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 91 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 39 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे.
देशात कोरोनाचा वेग कमी: १ लाख ६७ हजार ५९ बाधित
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असली, तरी मृत्यूची वाढ चिंताजनक आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशात काल प्रथमच दोन लाखांच्या खाली बाधित सापडले.
देशात गेल्या २४ तासात १ लाख ६७ हजार ५९ बाधित झाले आहेत, तर १ हजार १९२ जणांनी आपला जीव गमावला. देशात मागील २४ तासात २ लाख ५४ हजार ७६ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
देशात आजघडीला १७ लाख ४३ हजार ५९ ॲक्टीव्ह केसेस आहेत. देशातील डेली पॉझिटिव्हीटी रेट 11.69% वर आला आहे. आजवर देशात 1,66,68,48,204 जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.
देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर १५.७७% आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १५.७५% नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दैनंदिन ३ लाखांहून कमी कोरानाबाधित आढळत आहेत. २४ जानेवारीला २ लाख ५५ हजार ८७४ कोरोनाबाधित आढळले होते. यादिवसानंतर सातत्याने दैनंदिन कोरोनबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)