मोबाईलवरूनही करू शकता तुम्ही मतदार ओळखपत्रातील पत्ता अपडेट
मतदार ओळखपत्र(Voter ID card) हे महत्वाचा सरकारी दस्तावेज म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये १८ वर्षावरील प्रत्येक नागरिक हा मतदान करू शकतो तसेच मतदार ओळखपत्र असल्यास प्रादेशिक,राष्ट्रीय स्तरावरील निवणुकामध्ये मतदानाची परवानगी देण्यात येते.
जर मतदार ओळखपत्र नसेल तर अडचणी येतात.
आपण घर सोडले किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेलो कि आपल्यलाला आधार कार्ड किंवा मतदार कार्ड वरील पत्ता बदलणे गरजेचे असते. ते जर केले नसेल तर खूप अडचणी निर्माण होतात.
ह्या वेबसाईट वर करू शकता तुम्ही मतदार ओळखपत्रातील पत्ता अपडेट – http://www.nvsp.in/
१ ) वर दिलेल्या वेबसाईट(Website) वर जावा.
२ ) त्यावर लॉगिन हा पर्याय निवडून लॉगिन प्रक्रिया(Process) पूर्ण करा.
३ ) लॉगिन झाल्यांनतर तुम्हाला पत्ता बदलणे आहे हा पर्याय(Options) निवडा.
४ ) तुम्हाला दोन विकल्प दिसतील त्यातील तुम्ही निवडावे ‘ तुमच्या ओळखपत्रात बदल करायचा आहे कि कुटंबातील सदस्याचा’
५ ) (सेल्फ) Self म्हणजे तुम्ही (फॅमिली) Family कुंटुबातील सदस्य ह्यातील एक निवडा(Select)
६ ) तुमच्या स्क्रीन वर फॉर्म क्रमांक ६ उघडला जाईल त्यात तुम्हाला पत्ता विचारला जाईल. मतदारसंघ तुमची वैयक्तिक(Personal) माहिती व्यवस्तिथ भरावी
७ ) माहिती भरून झाल्यांनतर तुम्हाला सध्याचा पत्ता तसेच वयाचा दाखला(Proof of age) आणि फोटो अपलोड करावा लागेल. त्यांनतर शेवटी कॅप्चा प्रविष्ट करावा.
८ ) सबमिट(submit) पर्याय निवडा त्यांनतर तुमच्या नवीन पत्यावर नवीन मतदार आयडी पाठवला जातो.