बीड

बीड जिल्ह्यात 165 कोरोना बाधित:राज्यात 35756 तर देशात 2 लाख 86384 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1165 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 165 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1000 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 46 आष्टी 21 बीड 40 धारूर 2 गेवराई 6 केज 8 माजलगाव 7 परळी 19 पाटोदा 8 शिरूर 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 126 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 126 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 6535 झाली असून 2847 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 12.44 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.54% टक्के असून 1 लाख 1782 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1906 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यात कोरोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यात आज 79 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के आहे.

देशात कोरोनाचे २ लाख ८६ हजार ३८४ नवे रुग्ण

देशातील कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ८६ हजार ३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५७३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दिवसभरात ३ लाख ६ हजार ३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २२ लाख २ हजार ४७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दैंनदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.५९ टक्के आहे.

याआधीच्या दिवशी २ लाख ८५ हजार ९१४ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ६६५ जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात २ लाख ९९ हजार ७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. दिलासादायक बाब म्हणजे दैंनदिन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *