उस्मानाबाद

अबब लोहारा शहर स्वच्छते साठी मासिक आठ लाखापेक्षा अधिक खर्च !

उस्मानाबाद-उदय कुलकर्णी

लोहारा नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर लोहारा वासीयांचा कायापालट झाला नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण होऊ लागल्या यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असले तरी आज ही अनेक प्रभाग नागरिकांच्या सुविधेपासून ‘आ’ वासून आहेत.

मतदात्यांनी प्रभागाचा विकास होईल या आशेपोटी निवडून दिले परंतु अनेक प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधेवर गदा आले आहे. असे असलेतरी स्वच्छतेच्या दिलेल्या ठेक्यात मात्र हयगय न करता संपूर्ण शहराचा स्वच्छतेचा ठेका देण्यात आले आहे.” सुंदर शहर स्वच्छ शहर” या उक्ती प्रमाणे 14 व्या वित्त आयोगातील निधी चा वापर शहरासाठी केला जात आहे वास्तविक पाहता लोहारा शहर हे ग्रामीण भागातील असल्यामुळे येथील महिला घरासमोरील अंगण झाडू व साफ सफाई करतात आणि ठेकेदाराकडून ते गोळा केलेला ओला व सुका कचरा उचलले जाते.यामुळे रोगराई आणि दुर्गंधी पासून नागरिकांचा बचाव झाला. “ज्याचे आले म्हणा तेथे कोणाचेच चालेना” याप्रमाणे गटारी साफ सफाई केली जाते. शहरात सौचालय चा बिगुल अधिक वाजवले जाते प्रत्यक्षात शहरात सौचालयाची तुरळक संख्या आहे.त्याचे ही देखभाल व पाण्याचे आयोजन व दुरुस्तीच्या नावाने हजारो रुपये खर्च दाखवण्यात आले असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे. नवीन बांधकाम केलेल्या सौचालयाची दुरावस्था झाली आहे. साफ सफाई ची बोंबाबाब व पाण्याची नवीन पाईपलाईन मोडकळीस झाली असून उखडली आहे वरील पत्रे कधी काळी उडून गेले आहेत. तर पाण्याचा थेंब बर पत्ता नाही तोट्या चोरीस गेलेले आहेत. हिच परिस्थिती सर्वत्र आहे प्रभाग पाच मधील पोलीस ठाणे च्या पाठीमागील सौचालयात तर मल आणि घाणीने भरले असून पाण्याचे नियोजन नसल्यामुळे बंद अवस्थेत आहेत. साफ सफाई मात्र कागदोपत्री दाखवले जाते आज घडीला इंदिरा नगर भागातील नव्याने बांधकाम केलेले सौचालय ही बंद अवस्थेत दिसून येतात असे असले तरी विविध कामाचा अधिक भार व शासनाने ठरवून व अनिर्वाय केलेल्या सूचनांचे मात्र पालन करीत कागदोपत्री मेळ दाखवून हजारो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे. तर स्वछतेच्या नावाखाली आठ लाखाच्या पुढे बील उचलले जाते वास्तविक पाहता शहरात नव्याने गटारी झाले असले तरी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मात्र दैनंदिन मुख्य बाजार पेठेतील आठवडी बाजार शुक्रवार संपल्यानंतर शनिवारी मात्र झाड लोट प्रामुख्याने करावे लागते हे मात्र उघड आहे आणि स्वच्छता कर्मचारी झाड लोट ही करतात मुख्य रस्ते वगळता कुठेच शहरात कचरा मात्र दिसून येत नसल्यामुळे शासनाचे लाखो रुपये कचऱ्याप्रमाणे वाया जात असल्याने स्वतः संबंधित वरिष्ठांनी लक्ष घालून शहानिशा करून होणारा वायफट खर्च बंद करून तेच निधी ज्या प्रभागात अद्याप नागरिकांच्या मूलभूत सुविधा झाल्या नाहीत अशा प्रभागात खर्च करावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.ग्राम पंचायत प्रमाणे मजुराची रोजगार निर्मिती करावी.

पूर्वी ग्राम पंचायत कार्यकाळात गाव स्वच्छ व रस्ते परिसर स्वच्छ करण्यासाठी काही महिला मानधनावर ठेवण्यात आल्या होत्या. परंतु नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर ती प्रथा बंद झाली. पूर्वी साथ ते आठ महिला शहर स्वच्छ करायचे त्याच पद्धतीने नगर पंचायत ने रोजगार निर्मिती करीत मानधनावर झाड लोट करण्यासाठी महिला,पुरुष,चारचाकी वाहन चालविण्यास चालक, ठेवल्यास कमी रकमेत शहर स्वच्छता होईल आणि शिल्लक रक्कम नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामसभे प्रमाणे खर्च केल्यास एक वेगळा आदर्श निर्माण होईल. अशी मागणी जेष्ठ नागरिकांतून केली जात आहे.

लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष-दिपक रोडगे यांची प्रतिक्रिया
सध्या प्रभागात महिला पुरुषासाठी नवीन सौचालय बांधण्यात आले आहे काही महिन्यात हे सौचालयाची दुरावस्था बेवारशा प्रमाणे झाली आहे. प्रत्यक्षात नगर पंचायत व विरोधी गट नेता तसेच ग्रामस्थांच्या समोर या सौचालयाचा वास्तव पंचनामा करावा तेव्हांच सर्व काही निदर्शनास येईल नुसते कागदोपत्री व्यवस्था उपाययोजना होतात प्रत्यक्षात काहीच नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *