बीड

बीड जिल्ह्यात 32 कोरोना बाधित:राज्यात 41134 तर देशात 1 लाख 59632 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1410 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1378 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 बीड 16 गेवराई 2 माजलगाव 1 परळी 4 पाटोदा 1 शिरूर 4 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात कोरोनाचा उद्रेक:तब्बल 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित

मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 9 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यात 133 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज 133 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1009 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 439 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.07 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 73 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 57 हजार 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे

देशात २४ तासांत १ लाख ५९ हजार ६३२ नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ५९ हजार ६३२ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा वाढून १० टक्क्यांवर गेला आहे.

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १,५९,६३२ नवीन रुग्ण आढळलेत. तर ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ५ लाख ९० हजार ६११ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. देशातील करोना रुग्ण वाढीचा दर हा १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *