बीड

बीड जिल्ह्यात आज 26 कोरोना बाधित:राज्यात 40925 तर देशात 1लाख 41986 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1737 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 1 बीड 10 धारूर 2 गेवराई 1 केज 2 माजलगाव 1 परळी 3 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात रुग्णवाढ:40925 नवे बाधित

राज्यात आज तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 876 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

देशात नवे १ लाख ४१ हजार ९८६ रुग्ण

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात नवे १ लाख ४१ हजार ९८६ रुग्ण आढळून आले.

तर २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत ४०,८९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले. रुग्णसंख्या वाढल्याने रोजचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२८ टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात ४ लाख ७२ हजार १६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात लसीचे १५० कोटी डोस देण्यात आले आहेत.

गुरूवारी दिवसभरात १ लाख १७ हजार १०० कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ३०२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. तर देशाचा कोरोनामुक्ती दर ९७.५७ टक्क्यांपर्यंत घसरला होता. यापूर्वी ६ जून २०२१ रोजी देशात १ लाख ६३६ कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती. देशात कोरोना तपासण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे.

ओमायक्रॉन रुग्णसंख्या ३,०७१ वर

कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३,०७१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १,२०३ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *