बीड जिल्ह्यात रुग्ण वाढले:आज 16 कोरोना बाधित:राज्यात 36265 तर देशात एक लाखाच्यावर रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1776 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1760 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 1 बीड 7 गेवराई 1 केज 1 परळी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 24 तासात 36,265 नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ओमायक्रॉनचे 79 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 876 रुग्णांची नोंद झाली आहे. आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
देशात कोरोनाचे 1 लाख 17 हजार 100 नवीन रुग्ण
नवी दिल्ली, 07 जानेवारी: गुरुवारी भारतात (India) कोरोनाचे (Corona Virus) एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांहून अधिक झाली आहे.
गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1 लाख 17 हजार 100 नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी तुलनेत 28.8 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. बुधवारी देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 7 महिन्यांनंतर भारतात नवीन प्रकरणांची संख्या 1 लाख पार झाली आहे.
यापूर्वी 6 जून रोजी प्रकरणे एक लाखाच्या पुढे गेली होती. अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. आजपासून 8 दिवस आधी, जिथे संसर्गाच्या रुग्णांनी 10 हजारांचा आकडा ओलांडला होता. देशात आतापर्यंत कोरोनाचे 3,52,26,386 रुग्ण आढळले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)