बीड जिल्ह्यात आज 10 कोरोना बाधित:राज्यात 12160 तर देशात 37379 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1273 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1263 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 2 बीड 4 गेवराई 1 केज 2 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात सोमवारी तब्बल 12160 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी तब्बल 12 हजार 160 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 748 बाधित कोरोनामुक्त झाले होते. कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढतच आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने बारा हजाराचा टप्पा देखील ओलांडला आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित महाराष्ट्रात आहेत. काल राज्यात 68 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालेली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 578 वर पोहचली आहे. त्यापैकी 259 बाधित ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.
भारतात सोमवारी दिवसभरात ३७३७९ नवे रुग्ण
देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे.
देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. भारतात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले.
तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोमनामुळे प्राण गमावले. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे.
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात तीन जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकऱण मोहिम सुरु करण्यात आली आहे. या वयोगटाला कोव्हॅक्सिन लशीचे डोस दिले जाणार आहे. आतापर्यंत लसीकरणासाठी ५५ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर काल दिवसभरात ४० लाखाहून अधिक जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर आतापर्यंत प्रौढांना सुरु असलेल्या लसीकऱण मोहिमेत 146 कोटी 70 लाख 18 हजार 464 डोस देण्यात आले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)