बीडकरांना मोठा दिलासा:कोरोना रुग्णसंख्या शून्यावर
बीड – राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी एकाही करोना रुग्णांची नोंद झाली नाही. सोमवारी आरोग्य विभागाला 523 संशयितांचा अहवाल प्राप्त झाला.
त्यामधील सर्वच्या सर्वच 523 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा संभाव्य धोका ओळखून बीड प्रशासन सतर्क झाले आहे. ऑक्सिजन, बेड, डॉक्टरांची जमवाजमवी वेगात सुरू असताना बीडचा करोना रुग्ण शून्यावर गेला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात एकूण 42 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आज आलेल्या करोना रुग्णांच्या अहवालात एकही संशयित पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. तरीही प्रशासनाकडून करोनाच्या संदर्भात सगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.