बीड

बीड जिल्ह्यात आज 10 कोरोना बाधित :तर 46 रुग्णांवर उपचार सुरू

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1190 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1180 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 2 बीड 4 शिरूर 1 माजलगाव 1 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

एकूण 46 रुग्णांवर सध्या उपचार सुरू

बीड जिल्ह्यात काल 20 रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण एक लाख तीन हजार 646 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 1लाख 762 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, आतापर्यंत बीड जिल्ह्यात 2838 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बीड जिल्ह्यात 0.7 टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आढळले आहे,

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *