बीड

जिल्ह्यात ६ लाख ३३७ पिकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३५० कोटी रुपये पिक विमा रक्क्म

बीड, दि. १६:- यंदाच्या खरीप २०२१ या हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ज्या विमाधारकांनी पूर्वसुचना दिल्या व त्यातील जे विमाधारक नुकसान भरपाईस पात्र ठरले, त्यांचे बॅक खात्यावर पंतप्रधान पिक वीमा योजनेतील विमा रक्कमा जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती मुळे विविध पिकांचे नुकसान झालेल्या ४ लाख ९५ हजार ४९८ शेतक-यांच्या खात्यावर पिकविमाची भरपाई रक्कम २२० कोटी ५७ लाख रुपये रक्कम जमा करण्यात येत अाहे तसेच ४ लाख ४१ हजार ९११ शेतक-यांच्या खात्यावर सोयाबीन पिकविमाची भरपाई रक्कम १४९ कोटी ८८ लाख  रुपये जमा करण्यात येत आहे. याचबरोबर एकूण जवळपास ६ लाख ३३७ पिकविमाधारक शेतकऱ्यांना ३५० कोटी रुपये रक्कम देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. नुकसानीची सूचना कंपनीला दिलेल्या ६ लाख २ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या नोंदी नुसार या सर्व नुकसानीचे सर्व्है पूर्ण झाले आहेत. 

भारतीय कृषि पिक विमा कंपनी प्रतिनिधींशी शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

तसेच याबाबत काही विमाधारक यांना अडचणी असतील, शंका असतील त्यांनी भारतीय कृषि पिक विमा कंपनी चे तालुका / जिल्हा स्तरीय प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन बी के जेजुरकर , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *