बीड

बीड जिल्ह्यात रुग्णवाढ आज 23 पॉझिटिव्ह:राज्यात 789 तर देशात 9414 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1285 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 23 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1262 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 2 बीड 3 केज 1 माजलगाव 1 वडवणी 16 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 789 नवीन रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ७८९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, सात जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात मुंबई २१८, ठाणे जिल्हा ११९, नगर जिल्हा ६३, पुणे जिल्हा १८२, सातारा जिल्हा ३३ रुग्ण आढळले.
मृतांमध्ये मुंबई, नाशिक , सोलापूर, औरंगाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी एक तर पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

देशात 9419 नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत ९,४१९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून एकूण करोनाबाधितांची संख्या तीन कोटी ४६ लाख ६६,२४१ झाली आहे. सध्या ९४,७४२ उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली.
गेल्या २४ तासांत १५९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या चार लाख ७४,१११ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *