बीड

बीड जिल्ह्यात आज 12 पॉझिटिव्ह :राज्यात 852 तर देशात 8318 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 782 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 770 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 6 बीड 1 केज 1 परळी 2 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

महाराष्ट्रात 852 नवे रुग्ण

काल दिवसभरात महाराष्ट्रात 852 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 34 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय, आज 665 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.7 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 852 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, कोरोनामुळे 32 बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 33 लाख 32 हजार 723 वर पोहचली आहे. आज राज्यात 665 बाधित कोरोनामुक्त झाले. ज्यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्याने 64 लाख 80 हजार 61 चा टप्पा गाठला आहे. राज्यातील डेथरेट 2.12 टक्के एवढा झाला आहे.

देशात 8 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात देशात 8 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

तर 465 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान 10 हजार 967 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 एवढी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 7 हजार 19 एवढी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात एकूण 4 लाख 67 हजार 933 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात 121.06 कोटी नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे. देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट 98.34% एवढा झाला आहे. तर देशातील पॉझिटिव्हिटी रेटही घसरला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.86% एवढा झाला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट मागील 54 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 13 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.88 टक्के एवढा झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *