बीड जिल्ह्यात आज 9 पॉझिटिव्ह:राज्यात 960 तर देशात 9283 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1044 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 3 बीड 5 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1043रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 78 हजार 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 366 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 84 हजार 261 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 49 , 51, 994 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. जाणून घेऊया देशाची सध्याची कोरोनास्थिती… केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)