ऑनलाइन वृत्तसेवा

शिवसेना जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती:लवकरच नव्या जिल्हाप्रमुखाची घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हा प्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे

बीड जिल्ह्यात घुटका साठवणुकीवरून मध्यंतरी पोलिसांनी कारवाई केली होती यात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचेही नाव आले आहे,यावरून बरीच चर्चा होऊ लागली,ही बाब पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर जिल्हाप्रमुख बदलण्याचे आदेश देण्यात आले,जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देऊन नवीन जिल्हाप्रमुख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *