ऑनलाइन वृत्तसेवा

एसटीच्या खासगीकरणाचा विचार नाही–परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यातच तोटयात असलेल्या एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा होती. मात्र, या ही चर्चा खोटी असून सध्या एसटीच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

अनिल परब म्हणाले, सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही.

इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *