शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे विठ्ठल चरणी लीन:पुण्यात होणार अंत्यसंस्कार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर पुरंदरे (जन्म 29 जुलै 1922) हे बाबासाहेब पुरंदरे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. भारतातील एक चांगले लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. 25 जानेवारी 2019 रोजी त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
त्यांचं बहुतांशी लेखक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहे. त्यांना शिवशाहीर म्हणून संबोधले जात होते. त्यांना मुख्यतः जाणता राजा या लोकप्रिय नाटकासाठी ओळखले जाते. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश आणि गोव्यातही लोकप्रिय होते. पुरंदरे यांनी पुण्याच्या पेशव्यांच्या इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माधव देशपांडे आणि माधव मेहेरे यांच्यासह १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण योगदानासाठीही त्यांना ओळखले जाते. 2015 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ‘ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.