बीड जिल्ह्यात आज 10 पॉझिटिव्ह:राज्यात 751 तर देशात 10126 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 879 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 869 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 3 बीड 3 धारूर 1 केज 2 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ७५१ नवीन करोनाबाधित
राज्यात दिवसभरात १ हजार ५५५ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ७५१ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर १५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६०,६६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.६२ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१८,३४७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
देशभरात कोरोनाचे 10126 नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10 हजार 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (9 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,126 अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 3,43,77,113 पोहोचली आहे. तर 4,61,389 लोकांचा मृत्यू झाला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)