बीड जिल्ह्यात आज 12 पॉझिटिव्ह:राज्यात 1193 तर देशात 11903 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 624 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 612 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 3 बीड 1 केज 1 माजलगाव 3 परळी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नव्या रूग्णांचं निदान
महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1519 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 55 हजार 100 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 टक्के झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज घडीला 15 हजार 119 सक्रिय रूग्ण आहेत.
देशात ११,९०३ रुग्णांची नोंद
देशातील रुग्णसंख्येत किंचित चढउतार होत असून गेल्या २४ तासांत ११,९०३ रुग्णांची नोंद झाली तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २६ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १२९ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ०८ हजार १४० जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५९ हजार १९१ झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण करोनामुक्त झाले आहेत.
दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.११ टक्के इतका नोंदला असून गेल्या ३० दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.१८ टक्के नोंदला आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)