बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 9 पॉझिटिव्ह तर 117 सक्रिय रुग्ण:राज्यात 1172 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 258 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 149 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 4 बीड 3 माजलगाव 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 117 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 6 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 117 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3291 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0367 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.5% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2807 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,16%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3178 पैकी 3034 बेड शिल्लक आहेत

गेल्या 24 तासात 1,172 नवीन रुग्णांची भर

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,172 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,399 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.57 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात सध्या 16,658 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1,65,826 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 837 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6,26,67,211 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,423 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 10 हजार 423 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (2 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,423 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,42,96,237 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4,58,880 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *