बीड जिल्ह्यात आज 8 पॉझिटिव्ह तर 133 सक्रिय रुग्ण:राज्यात 1428 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 984 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 976 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 4 बीड 3 माजलगाव 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 133 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 8 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 132 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3261 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0325 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.7% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,15 %इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3014 बेड शिल्लक आहेत
राज्यात 24 तासात 1428 नव्या रुग्णांची नोद
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 418 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 428 नव्या रुग्णांची नोद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 वर पोहचली आहे. यापैकी 64 लाख 45 हजार 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 40 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97. 54 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 71 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 896 वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
देशात 14,348 जणांना कोविड 19 ची लागण
भारतामध्ये मागील 24 तासांत 14,348 जणांना कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर 805 मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान 13,198 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3,42,46,157तर एकूण मृत्यूचा आकडा 4,57,191 पर्यंत पोहचला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)