ऑनलाइन वृत्तसेवा

फेसबुकचं नाव बदललं:नव्या रुपात दिसणार फेसबुक; झुकरबर्ग यांची घोषणा

सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने गुरुवारी रात्री आपल्या कंपनीच्या नाव्या नावाची ( facebook announces changing company name to meta ) घोषणा केली. आता फेसबुक (facebook) ‘मेटा’ ( Meta ) या नावाने ओळखली जाईल. फेसबुकने ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियाचे नवे पर्व मेटावर्स (metaverse) हा सोशल कनेक्शनचा नवा मार्ग असेल. हा एक सामूहिक प्रोजेक्ट आहे. संपूर्ण जागातील नागरिकांद्वारे तो बनवण्यात येईल. सर्वांसाठी तो खुला असेल, असं फेसबुकने ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपण आता फेसबुक नव्हे तर मेटावर्स आहोत, असं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने कंपनीच्या नव्या नावाची घोषणा करताना म्हटलं आहे. आता सोशल कनेक्शनचे नवे पर्व सुरू झाले आहे, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.


फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरून एकामागून एक अनेक ट्विट केले. इन्स्टाग्राम, मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅप या आम्ही बनवलेल्या अॅप्सची नावं कायम राहतील. विविध अॅप आणि तांत्रिक बाबींना आता नव्या ब्रँडअंतर्गत आणले जाईल. कंपनी आपली कॉर्पोरेट रचना बदलणार नाही, असं फेसबुकने म्हटलं आहे. नवीन नाव मेटावर्सच्या निर्माणावर आपले लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असं कंपनीचा सीईओ मार्क झुकरबर्गने सांगितलं.
सर्वांचे स्वागत आहे. आम्ही एक अशी कंपनी तयार केली आहे, जिने तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. आमचा प्रयत्न हा लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं आणि त्यातून नवी अर्थव्यवस्था उभारण्याचा आहे, असं कंपनी कनेक्ट इव्हेंटमध्ये मार्क झुकरबर्ग म्हणाला.
नव्या नावातून आमच्या उद्देशांची झलक दिसून येते. आम्हाला काय करायचे आहे, हेही त्यातून स्पष्ट होतंय. जुने नाव आमची पूर्ण आणि योग्य ओळख सांगण्यात तेवढे यशस्वी ठरले नाही. तरीही लाखो लोक आमच्याशी जुळले. येत्या काळात आम्ही अधिक उत्तम प्रकारे स्वतः ला सादर करू शकू, असं झुकरबर्गने म्हटलंय.
झुकरबर्गने आपल्या ट्विटर हँडललाही @meta ला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. meta.com लिहिल्यावर थेट फेसबुकच्या होमपेजवर री-डायरेक्ट होईल.

‘मेटावर्स’ हा शब्द सर्वप्रथम तीन दशकांपूर्वी डायस्टोपियन कांदबरित करण्यात आला होता. आता नवीन शब्द सिलिकॉन व्हॅलित चर्चेचा विषय बनला आहे. या शब्दाचा उपयोग हा डिजिटल जगात व्हर्च्युअर आणि इंटरॅक्टिव्ह स्पेस समजण्यासाठी केला जातो. मेटावर्स म्हणजे एक व्हर्च्युअल जग आहे. या जगात एखादी व्यक्त शारिरीकरित्या उपस्थित नसतानाही ती तिथे उपस्थित राहू शकते. यासाठी व्हर्च्युअल रियालिटीचा उपयोग केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *