बीड

बीड जिल्ह्यात आज 9 पॉझिटिव्ह तर 139 सक्रिय रुग्ण:राज्यात 889 तर देशात 14306 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 595 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 585 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 4 धारूर 3 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 139 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 14 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 139 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3228 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 289 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.7% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,15 %इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2988 बेड शिल्लक आहेत

राज्यात 24 तासात 889 नवे रुग्ण

कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra)निर्बंध पुन्हा एकदा कडक लावण्यात होते. ज्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात राज्याला मोठे यश आले.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यातच आज महाराष्ट्रात हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, मृत्युंच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात केवळ 23 हजार 184 रुग्ण सक्रिय आहेत. ही राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक माहिती आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 889 नवे रुग्ण आढळून आले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 1 हजार 586 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66 लाख 3 हजार 850 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 64 लाख 37 हजार 25 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रिक्वव्हरी रेट 97.47 वर पोहचला आहे.

देशात 24 तासांत 14306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात दरदिवशी 15 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 18 हजार 762 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 89 हजार 774 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 67 हजार 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 4 लाख 54 हजार 712 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात एकूण 1 लाख 67 हजार 695 रुग्ण सक्रिय आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *