बीड जिल्ह्यात आज फक्त 4 पॉझिटिव्ह तर 149 सक्रिय रुग्ण:राज्यात 1410 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 519 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 4 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 515 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 1 बीड 1 केज 1 माजलगाव 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 149 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 12 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 149 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3224 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 275 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 2% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,47%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2982 बेड शिल्लक आहेत
गेल्या 24 तासात राज्यात 1,410 नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे.
राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15906 नवे रुग्ण
देशात जीवघेण्यात कोरोना व्हायरस (Covid-19) च्या नव्या रुग्णांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 54 हजार 269 वर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या एक लाख 72 हजार 594 वर पोहोचली आहे. तर यापैकी एक लाख 74 हजार 594 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे तीन कोटी 35 लाख 48 हजार 605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)