बीड जिल्ह्यात आज 18 पॉझिटिव्ह तर 143 सक्रिय रुग्ण:राज्यात 1701 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 909 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 891 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 4 बीड 4 केज 1 परळी 2 पाटोदा 2 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 143 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 19 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 143 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3206 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 263 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.7% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,14%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2984 बेड शिल्लक आहेत
राज्यात 1701 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1701 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 66 लाख 01 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे.
राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात सध्या 24 हजार 022 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात गेल्या 24 तासात 666 जणांचा मृत्यू
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे. देशात गेल्या 24 तासात 16 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 53 हजार 708 वर पोहचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, देशात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी 563 मृत्यू केरळ राज्यातील आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)