बीड जिल्ह्यात आज 9 पॉझिटिव्ह तर 153 सक्रिय रुग्ण:राज्यात 1632 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1354 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1345 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 2 बीड 1 गेवराई 1 केज 1 पाटोदा 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 153 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 15 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 153 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3197 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 244 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.30% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,13%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2975 बेड शिल्लक आहेत
राज्यात दिवसभरात करोनाच्या १,६३२ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या १,६३२ नव्या रुग्णांचे निदान झाले तर ४० जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपैकी निम्म्यांपेक्षा जास्त रुग्ण हे मुंबई, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांतच आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.
राज्यात सध्या २४ हजार १३८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.
राज्यात आतापर्यंत ६५ लाख ९९ हजार जणांना करोनाची लागण झाली असून, १ लाख ३९ हजार जणांचा मृत्यू झाला.
देशात १६ हजार ३२६ नव्या कोरोना रुग्णांची
भारतात मागील २४ तासात करोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ इतकी झालीय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलीय.
भारतात १ लाख ७३ हजार ६९४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत आढळलेल्या ३ कोटी ४१ लाख ५९ हजार ५६२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३५ लाख ३२ हजार १२६ जण बरे झाले.
कोरोनामुळे देशात ४ लाख ५३ हजार ७४२ मृत्यू झाले. मागील २४ तासांत देशात १६ हजार ३२६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६६६ मृत्यूची नोंद झाली.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)