बीड जिल्ह्यात आज 18 पॉझिटिव्ह तर 150 सक्रिय रुग्ण:राज्यात 1573 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1382 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1364 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 6 बीड 3 गेवराई 2 केज 3 माजलगाव 2 पाटोदा 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 150 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 22 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 150 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3179 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 229 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.7% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,14%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2979 बेड शिल्लक आहेत
राज्यात १ हजार ५७३ नवीन करोनाबाधित
राज्यात काल दिवसभरात २ हजार ९६८ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार ५७३ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३०,३९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९८,२१८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९९२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
देशात २४ तासांत १८,४५४ रुग्णांची नोंद
देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली आहे. १ लाख ७८ हजार ८३१ रुग्णसंख्या बुधवारी नोंदली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.५२ टक्के इतकी आहे. मार्च २०२० नंतर ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे.तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.१५ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.
गेल्या २४ तासांत १८,४५४ रुग्णांची नोंद झाली तर १६० जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २७ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही ३० हजारांखाली तर सलग ११६ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख २७ हजार ४५० जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५२ हजार ८११ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)