बीड जिल्ह्यात आज 27 पॉझिटिव्ह तर 154 सक्रिय रुग्ण:राज्यात 1485 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1221 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1194 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 5 बीड 3 गेवराई 2 केज 2 माजलगाव 3,परळी 1 पाटोदा 5 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 154 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 24 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 154 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3124 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 175 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.00% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2795 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,14%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 2983 बेड शिल्लक आहेत
राज्यात 1485 नवीन रुग्णांचं निदान
मुंबई : करोनाचा संसर्ग कमी होत असताना राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसांतील सर्वांत कमी नवीन करोना रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Cases Update) आज करण्यात आली आहे. राज्यात आज 1 हजार 485 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे.
मुंबईत रविवारी एकाही करोना रुग्णाचा मृत्यू न झाल्याने समाधान व्यक्त केलं जात असतानाच राज्यात आज करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे. आज 2 हजार 078 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.4 टक्के एवढं झालं आहे.
राज्यात 27 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आज रोजी एकूण 29 हजार 555 सक्रीय रुग्ण आहेत.
24 तासांत 13,596 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 13,596 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 166 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात 19,582 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या 230 दिवसांनी सर्वात कमी झाली आहे. कोरोना महामारी च्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 81 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 39 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार 694 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)