महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात आजही दिलासा, 8 पॉझिटिव्ह तर 186 सक्रिय रुग्ण:राज्यात 1553 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 995 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 987जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 3 बीड 2 केज 2 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 186 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 20 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 186 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3106 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 128 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.44% आहे तर डेथ रेट 2.70%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2792 जणांचा बळी गेला आहे

राज्यात १,५५३ नवीन रुग्णांचे निदान.

मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली आली असून मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. राज्यात सध्या करोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. मुख्य म्हणजे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत असल्याने हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा ठरला आहे.
राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर होत चालल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे दिसत आहे. लसीकरण वेगवानपणे होत असल्याने त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्या घटत चालली असून आज दीड हजाराच्या टप्प्यावर ही संख्या आली आहे.
आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली तर दिवसभरात १ हजार ५५३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याचवेळी १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील करोनाची आजची स्थिती

  • राज्यात आज २६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
  • आज १,६८२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३८ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात १,५५३ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात सध्या करोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण.
    (वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *