मोठा दिलासा:बीड जिल्ह्यात आज फक्त 12 पॉझिटिव्ह:राज्यात 2149 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 832 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 820 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 4 केज 2 गेवराई 2 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 194 रुग्ण ऍक्टिव्ह
काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 19 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 194 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3094 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 108 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.7% आहे तर डेथ रेट 2.70%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2792 जणांचा बळी गेला आहे
राज्यात २ हजार १४९ नवीन करोनाबाधित
राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली. काल राज्यात २ हजार १४९ नवीन करोनाबाधित आढळले, तर १ हजार ८९८ रूग्ण करोनामधून बरे झाले.
तसेच, २९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१५,३१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.३७ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,८८,४२९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९७३४ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)