बीड

बीड जिल्ह्यात आज 18 पॉझिटिव्ह:राज्यात 2384 तर देशात 18987 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1690 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1672 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 2 बीड 6 धारूर 1 गेवराई 2 माजलगाव 2 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत

आज विजयादशमी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

राज्यात 2,384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2,384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 13 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.

राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे राज्यात सध्या 29 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

देशात 24 तासांत 18,987 रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय. गेल्या 24 तासांत 18 हजार 987 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशात 15 हजार 823 रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 226 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल नोंद करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत आजचा आकडा हा 16 टक्क्यांनी अधिक आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 6 हजार 586 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 62 हजार 709 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 51 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *