बीड जिल्ह्यात आज 21 पॉझिटिव्ह:राज्यात 2219 तर देशात 15823 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1981 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1960 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 4 बीड 4 गेवराई 3 केज 1 माजलगाव 2 परळी 4 पाटोदा 4 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात सध्या 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 15823 नव्या रुग्णांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, (बुधवारी) 24 तासांत कोरोनाच्या 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 14 हजार 313 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 7 हजार 653 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 42 हजार 901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 51 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)