बीड जिल्ह्यात आज 16 पॉझिटिव्ह:राज्यात 2069 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1683 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1667 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 2 बीड 3 गेवराई 2 केज 1 परळी 1 पाटोदा 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात फक्त 210 रुग्ण ऍक्टिव्ह
सोमवारी बीड जिल्ह्यात 14 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 210 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3039 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 44 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.66% आहे तर डेथ रेट 2.70%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2785 जणांचा बळी गेला आहे
२४ तासांत राज्यात २ हजार ०६९ रुग्णांचे निदान
करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच आज मृत्यूसंख्याही वाढली असल्याने काहिशी चिंताजनक स्थिती आहे. मात्र राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याने दुसरीकडे दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ०६९ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
काल दिवसभरात एकूण ३ हजार ६१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला.
काल राज्यात झालेल्या ४३ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ०७ हजार ९३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के इतके आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजार ५२५ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)