बीड

बीड जिल्ह्यात आज 20 पॉझिटिव्ह तर 226 ऍक्टिव्ह रुग्ण :राज्यात 1736 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1203 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1183 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 3 बीड 4 गेवराई 1 केज 2 परळी 1 पाटोदा 3 शिरूर 1 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 226 रुग्ण ऍक्टिव्ह

सोमवारी बीड जिल्ह्यात 20 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 226 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3019 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 8 रुग्ण बरे झाले आहेत,जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.9% आहे तर डेथ रेट 2.70%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2785 जणांचा बळी गेला आहे

मोठा दिलासा:राज्यात १ हजार ७३६ नव्या रुग्णांचे निदान

मुंबई: राज्याला सोमवारी मोठा दिलासा मिळाला असून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, कालच्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात १ हजार ७३६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा ही संख्या २ हजार २९४ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ०३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ०४ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के इतके आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार ११५ इतकी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *