ऑनलाइन वृत्तसेवा

विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता:यलो अलर्ट’ जारी

येत्या २४ तासात राज्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस एकाच वेळी पडणार अशी वेळ क्विचितच असते.
तसेच वातावरण सध्या निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे. (Maharashtra rain alert today Chance of rain with thunderstorms all over Maharashtra IMD )

यापूर्वी राज्यात पुढील चार ते पाच तासात जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यातील अहमदनगर, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे,पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड मध्ये पुढील तीन ते चार तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता..

राज्यात पुणे, नाशिक, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा,पालघर, ठाणे येथे ढगांची दाटी दिसत असून ह्या ३ ,४ तासात विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पालघर ठाणे पुणे नाशिक रायगड औरंगाबाद उस्मानाबाद बीड बुलढाणा येथे ढगांची दाटी दिसत असून ह्या ३ ,४ तासात विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *